उदगीर(प्रतिनिधी)- लातूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझेटिव्ह रूग्णाध्ये उदगीर शहर पुढे असून शहरातील आर्धा परीसर हा रेड झोनमध्ये अडकला गेला आहे. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले असून जनतेमध्ये कोरोनाविषयी भिती निर्माण झालेली आहे व त्यापासून आपण स्वत:चे संरक्षण कसे करावे यासाठी शसानाच्या वतीने व विविध संस्था, सामाजिक संघटनेच्या वतीने मास्क, सॅनिटाझर, हँडग्लोस वाटप करण्यात येत आहेत ज्यामुळे नागरीकामध्ये जनजागृती होत आहे.
उदगीर कांही दिवसापूर्वी रेड झोन मधून बाहेर पडण्याच्या मार्गावर होते पण अचानक पणे पुन्हा रेड झोन परीसर सोडून उदगीर शहरासह ग्रामीण मध्ये कोरोनाने शिरकाव केला. त्यामुळे उदगीर शहरातील नागरीकांना प्रश्न निर्माण झाला. यासाठी उदगीर येथील कुणाल किरण बागबंदे यांच्या माध्यमातून शिवशक्ती युवक मंडळ यांच्या वतीने रेडझोन परीसरातील नागरीकांना कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी व त्यापासून स्वत:चा बचाव करणयासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत यासाटी त्यांना संपूर्ण माहिती मिळण्यासाठी घरोघरी जाऊन मास्क, सॅनिटायझर व माहितीपत्रक काढून वाटण्यात आले व नागरीकांनी घाबरून न जाता कोरोनाचा मुकाबला करणसाठी आपल्या दैनंदिन जिवनातील अत्यावश्यक वस्तूमध्ये समावेश करून घ्यावे व माहितीपत्रकात दिलेल्या माहितीप्रमाणे त्याची रोज अमलबजावणी करावी जेणेकरून आपल्या परीसरात जरी कोरोना पॉझेटिव्ह रूग्ण आला तर आपले व आपल्या कुटुंबाचे संरक्षण करण्यास सोपो जाईल अशी जनजागृती कुनेकरी गल्ली, आठाणे गल्ली, चित्रनगरी गल्ली, इत्यादी परिसरात करणयात आली.
हा उपक्रम कुणाल बागबंदे यांच्या वतीने करण्यात आला यावेळी श्रीकांत पांढरे, अनिल बागबंदे, हणमत चणगे, मुन्ना होसाळे, मनोहर कानमंदे, सागर सोलापूरे, मनोज बिबराळे, प्रशांत अलमकेरे, सुरज बागबंदे, गणेश पांढरे, प्रकाश माका, शऱणप्पा अलमकेरे, बंटी अलमकेरे, रवी कड्डे, संगमेश्वर कोरे, राहूल गंदगे , गणेश कोरे, राहुल वारद, संगम हिप्पलगे, शेखर आठाणे, राजू कंटे आदींनी सहकार्य परीश्रम घेतले.